पावसाळ्यात शहराच्या सखल भागात पाणी साचते. बिळांमध्ये पाणी गेल्याने उंदीर बाहेर पडतात. बराच वेळ आडोसा न सापडल्यास पाण्यात गुदमरून मरतात. त्यांच्या शरीरातील घातक तत्त्वे पाण्यात मिसळतात. बचावलेल्या उंदरांचे मलमूत्रही पाण्यात एकजीव होते. स्पायरोशिट हा लेप्टोचा वाहक जीवाणू त्यात असतो. पायाला छोटी जखम असेल आणि अशा साचलेल्या पाण्यातून आपण गेलो तर जखमेतून हा जीवाणू शरीरात प्रवेश करतो. ग्रामीण भागात शेतामध्ये काम करताना हा जीवाणू नकळत आपल्या शरीरात प्रवेश करतो. कारण शेतात काम करताना छोट्या-छोट्या जखमा होतच राहतात.
- हिमोरेजिक लेप्टोस्पायरोसिस थोडा गंभीर स्वरूपाचा असतो. त्यात रुग्णाला कावीळ होते. अंगावर लाल चट्टे उठतात. शरीरातील प्लेटलेटस् मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने लघवी आणि थुंकीतून रक्त पडते. इतर अंतर्गत अवयवांमधूनही नकळत रक्तस्राव होतो. लिव्हर आणि किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी होते आणि रुग्ण दगावतो.
लक्षणे
- डोकेदुखी
- अंगदुखी
- प्रकाशात डोळे चुरचुरणे
- कापरे भरून ताप
- डोळे लाल होऊन पाणी येणे
- मानेला पुरळ उठणे
- पोटात वरच्या बाजूला वेदना होणे
काय काळजी घ्याल?
- शक्यतो साचलेल्या पाण्यातून जाणे टाळावे.
- जावे लागल्यास पाय घरी आल्यानंतर स्वच्छ धुवावेत.
- पायाच्या जखमांमध्ये पाणी शिरणार नाही यासाठी जखमा उघड्या ठेवू नयेत.
- तळव्यांना तेल लावावे, जेणेकरून पाणी शरीराला चिकटणार नाही.
- लेप्टोची लक्षणे दिसल्यास त्वरित रक्तचाचणी करावी.
सौजन्य:- चिरायू, सामना ०४०८२०११.
No comments:
Post a Comment