दक्षकन्या पार्वतीने आपल्याला मनाजोगता वर मिळवण्यासाठी केलेली उपासना म्हणजे हरतालिका व्रत होय. हिमालयाने आपल्या स्वरूपसुंदरी मुलीचा विवाह विष्णूशी करण्याचे योजिले होते. पण पार्वतीच्या मनात मात्र भोळा सांब वसला होता. त्यामुळे पार्वतीने आपल्या आराध्याचे वाळूचे शिवलिंग स्थापून पत्री, फूल फळांनी त्याचे पूजन केले व त्याला प्रसन्न करून घेतले याकामी तिला तिच्या सखीचे सहकार्य लाभले.
म्हणजे बघा पूर्वीपासूनच एका पट्टमैत्रिणीला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. त्यावेळी पित्याने ठरवलेल्या श्रीमंत वराला नाकारून आपल्या पसंतीच्या गरीबाशी (लौकिकार्थाने विष्णूपेक्षा शंकर साधेच!) लग्न करून त्याच्या बरोबर 'लंकेची पार्वती' बनून राहण्याचे धैर्य दाघवणारी उमा ही आजच्या समस्त स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य ह्या विचारांची उद्गातीच ठरते.
आजच्या काळातही जिथे अजूनही मुलीने पित्याच्या बोट दाखवलेल्या वराशी विवाह करण्याचाच आग्रह धरणार्या घरातून प्रेमविवाह म्हणजे 'अब्रह्मण्यम' तेव्हा ही या हिमगौरीने 'जब प्यार किया तो डरना क्या' ह्या ध्येयाने तिने शंकराला मिळवले.
आजच्या जमान्यातही आपल्या मनपसंत जोडीदाराला लग्नासाठी 'प्रपोज' करण्याचं धाडस किती जणीत असतं? उगीच पोकळ उसासे टाकत मनात झुरत सोन्याच्या पिंजर्यातील बंद मैना होण्यापेक्षा मोकळ्या रानातील राघूबरोबर त्याच्या हृदयाची स्वामिनी बनून राहण्यासाठी भरारी होण्याचे सामर्थ्य किती जणीत असते?
उमेने शंकराचे महत्त्व जाणले होते त्याच्या विरक्त वृत्तीवरच ती भाळली अन शेवटपर्यंत त्याच्या बरोबर कैलासावरच राहिली. लक्ष्मीप्रमाणे वैकुंठात रुसवे फुगवे केले नाहीत की आपल्या श्रीमंत माहेराचे गोडवे गायले नाहीत, बापाच्या घरून संपत्ती आणली नाही.
वास्तविक विष्णू त्यांच्या जातीचा (जात म्हणजे तरी काय एकाचप्रकारचे संस्कार, सांपत्तिक स्थिती याने निर्माण होणारे 'स्टेटस') त्याच्याशी लग्न करून ती सुखाने वैभवात लोळू शकली असती. मात्र, तिने स्वबळावर आणि आपल्या पतीच्या सामर्थ्यावर कैलासावर राज्य केले अन ती आदिमाता म्हणून गौरवली गेली. शंकराच्या तेजाने ती झाकोळली तर नाहीच पण उलट 'उमा-महेश्वरा'चा जोडा तर 'अर्धनारी नटेश्वर' म्हणून शोभला.
आजच्या काळातल्या मुलीच नव्हे तर स्त्रियाही हरतालिकेचे व्रत करतात अगदी निरंकार, रात्रभर जागरण करून व्रत करण्याची प्रथा उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर आहे. पण ते जागरण आपण योग्य गोष्टी करून, सत्कार्य करून किंवा किमान इतरांची कुचेष्टा न करता करतो का? उपवासाचा देवाच्या जवळ वास, त्याची आराधना हा उद्देश थोडाफार तरी साध्य होतो का? घरातील राजकारण त्या एका दिवशीही आपण थांबवतो का? हा विचार प्रत्येकीने करायला हवा.
सुरवातीला ज्या गुणावर भाळून आपण 'त्या'च्याशी लग्न केले नंतर तोच भांडणाचा मुद्दा का होतो? नवर्याची निस्पृहवृत्ती पाहून लग्न करणारी, नंतर तीच त्यालाच लाच घेण्यास प्रवृत्त करते असं का? आजच्या काळात जर स्त्रीने ठरवले तर भ्रष्टाचार बंद होईल. फक्त त्याची सुरवात प्रत्येकीने घरापासून करावी.
माझा तुझा नातेवाईक, मित्र-मैत्रीण असा भेद न करता जर योग्य व गरजू माणसाला मदत करण्याचा गुण मनाचा कोतेपणा कमी करून थोडासा वैचारिक, सामाजिक विचार प्रत्येकीने केला तर समाजात शांतता, प्रस्थापित होईल. उन्नती व विकास होईल. टाळी एका हाताने वाजत नाही पार्वतीला 'शिव' मिळाला तसाच प्रत्येकीला योग्य जोडीदार व महेश्वराला 'उमा' मिळाली तशी प्रत्येकाला सुज्ञ व धोरणी पत्नी मिळाली तरच जोडा शोभून दिसतो.
चांगलं माणूस मिळत नसतं ते व्हावं लागतं. अनुभवाने, सहवासाने, चांगल्या वाचनाने, चांगल्या आचरणाने मनातली किल्मिष काढून सहजीवन जगल्यास प्रत्येक जोडी आदर्श होऊ शकते. दोघांनी वादात एकेक पाऊल मागे जावे, सामंजस्य, योग्य सुधारणांत वाईट प्रथा सोडण्यात एकेक पाऊल पुढेच राहिले तर आपल्याबरोबर समाजही सुधारेल.
हे सणवार व्रत वैकल्य जोखड, जबाबदारी किंवा बोजा न वाटता त्यातून आत्मशुद्धी, आत्मिक उन्नती साधली तरच त्याचा खरा उद्देश्य साध्य होईल.

सौजन्य:-
नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे 'हरतालिका' हे व्रत सर्वांत श्रेष्ठ मानले जाते. हे व्रत केल्यामुळेच पार्वतीला भगवान शंकर वर म्हणुन प्राप्त झाले, अशी कथा आहे.
लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं सहजीवन नसतं. सहचारिणी बनताना स्त्री आपलं स्वत:चं म्हणून एक आर्थिक आस्तत्व घेऊन येत असते. लग्नानंतर आपल्या जोडिदाराने आपल्या आर्थिक व्यवहारांसंबंधी नीट माहिती देणं जरुरीचं आहे. लग्न दोन व्यक्तींचं होत असलं,तरी आजच्या आर्थिक समानतेच्या काळात पती-पत्नी दोघे आपले आर्थिक भूतकाळ एक सामायिक करत असतात. दोघांकडे असणारे असेट्स आणि लायबिलिटिज यांची पूर्ण कल्पना दोघांनाही असलेली उत्तम. गुंतवणुका, घेतलेली कर्जे, काढलेल्या पॉलिसिज, इन्श्युरन्स,मेडिक्लेम यांची माहिती विश्वासाने दिलेली नेहमीच चांगली. आयकर कायद्याच्या दृष्टीने पतीचे उत्पन्न पत्नी स्वत:च्या रिटर्नमध्ये दाखवू शकते. परंतु त्याकरिता तिचा उत्पन्नाशी असणारा थेट संबंध स्पष्ट दाखवता आला पाहिजे. पतीचे उत्पन्न जर तिने स्वत:च्या कोणत्याही प्रयत्नाशिवाय तिला मिळाले असेल, तर आयकर अधिनियम ६० ते ६४ अन्वये ते उत्पन्न पतीचे म्हणून गणले जाते आणि अर्थातच पतीला त्यावर टॅक्स भरावा लागतो. यालाच क्लबिंग ऑफ इन्कम असे म्हटले जाते. कंपनीच्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या पतीची पत्नी त्याचकंपनीकडून भरघोस वेतन घेत असेल तर तेही त्या पतीचे उत्पन्न समजले जाते. हे ही क्लबिंग होय. एखाद्या असेटमधून कमावलेले उत्पन्न जर पतीने पत्नीच्या नावावर ट्रान्सफर केले आणि त्यासाठी पत्नीकडून पुरेसा मोबदला घेतला नाही तर अशी ट्रान्सफरही पतीचेच उत्पन्न ठरू शकते. अर्थात लग्नाआधी केलेली ट्रान्सफ़र किंवा घटस्फोटानंतर केलेली ट्रान्सफर मात्र यात मोडत नाही. स्त्रियांना जास्त डिडक्शन असल्याने बर्याचदा पती लग्नानंतर पत्नीचे स्वतंत्र रिटर्न भरू लागतात. उदा. स्वत:च्या मालकीचे घर भाड्याने दिले असेल आणि ते भाडे स्वत:चे उत्पन्न म्हणून दाखवत असाल, तर ते घर आपल्या पत्नीला गिफ्ट द्या. आता त्याचे भाडे हे तिचे उत्पन्न असेल आणि अर्थात त्यावर कमी कर भरावा लागेल. (गिफ्ट पती पत्नीला किंवा पत्नी पतीला देऊ शकते. परंतु त्याकरता प्रसंग आयकर खाते फार महत्त्वाचे मानते. उदा. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस इत्यादी. इतर वेळी अकाली दिलेली गिफ्ट आयकर कायद्याच्या कचाट्यात सापडू शकते) गिफ्ट संबंधात जर अडचण येत असेल तर पती पत्नीला कर्ज देऊ शकतो. ते करताना बाजारभावाच्या जवळपास व्याज आकारायला मात्र विसरू नका. गिफ़्ट संबंधात सासू, सासरे व पती सोडून इतर व्यक्तींनी लग्नात दिलेली गिफ्ट आयकर खात्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरत नाही.
आपण शेअर बाजारात आलो आहोत नफा कमवायला. चर्चा करून वाद जिंकू, पण नफा मिळणार नाही. यावर उपाय म्हणजे रेटिंग एजन्सीनी आयपीओला कोणता दर्जा बहाल केला आहे ते बघायचे आणि अर्ज करायचा.
आता डीमॅट अकाऊंट उघडायचे कसे? हा प्रश्न आलाच. डीमॅट म्हणजे डिमटेरीअलाइज्ड खाते. कागदी शेअर हातात ठेवण्याऐवजी शेअर या खात्यात जमा करता येतात .जवळजवळ सगळेच दलाल ट्रेडिंग अकाऊंट उघडताना डीमॅट अकाऊंट उघडून देतात. असे खाते उघडण्यात आपली आणि दलालाची सोय असते. याखेरीज बर्याचशा सरकारी आणि सहकारी बँका पण डीमॅट खाते उघडून देतात. हे खाते उघडल्यावर शेअरची खरेदी विक्री सुरू करण्यासाठी तुम्ही सज्ज झालात असे समजा... 