झोपेत घोरणे हा अनेकदा गंमतीचा विषय असतो. परंतु, ही एक गंभीर समस्या असल्याचे नुकतेच आढळून आले आहे. ‘स्लीप ऍप्निया’ ही या घोरण्याच्या पुढची पायरी आहे. श्वासनलिकेतील अडथळ्यांमुळे अनेकदा झोपेत श्वास घेताना जो आवाज होतो. त्याला आपण ‘घोरणं’ असं म्हणतो. पण हा अडथळा वाढत गेला की अचानक काही सेकंदासाठी तात्पुरता श्वास बंद पडतो. यालाच ‘स्लीप ऍप्नीया’ म्हणतात. घशातील टॉन्सिल खूप वाढले असतील, घशात किंवा तोंडात मास वाढलेले असेल, किंवा लठ्ठ लोकांमध्ये घशाजवळ किंवा छातीजवळ मेद साचलेले असेल तर ही समस्या उद्भवते. तसेच ही समस्या स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये दुपटीने जास्त आढळून येते.
‘स्लीप ऍप्नीया’मुळे होणारे दुष्परिणाम
प्रत्येक वेळी श्वास बंद पडला की झोपमोड होते.
सततची झोपमोड होत असल्यामुळे झोप पूर्ण होत नाही.
ब्लड प्रेशर वाढते.
नाका-तोंडातून घोरण्याची सवय लागते.
कधीकधी श्वास गुदमरल्यासारखे वाटते.
अगदी टोकाचा दुष्परिणाम म्हणजे कधीकधी श्वास कायमचा बंद पडू शकतो. त्यामुळे अनेकदा काहींचा झोपेत मृत्यू झाल्याच्या घटना घडतात.
सौजन्य :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र. तेव्हा आता सावध होउन लट्ठ पनापासून दूर रहा.
No comments:
Post a Comment