मे महिना संपला... आता पावसाळा सुरू होईल. वातावरण बदलेल. नियम शिथिल होतील. बंधनं मोकळी होतील... जीभ चटावेल. रस्त्यावरच्या पावभाजीकडे म्हणा किंवा इतर फास्ट फूडकडे नजर जाईल. पण नकोच ते! आपल्याला आपल्या हृदयाची काळजी आयुष्यभर घ्यायची आहे. कारण लाइफ कितीही फास्ट झालं तरी आपल्याबरोबर हृदय आयुष्यभर फिरणार आहे आणि तेच टिकवायचं आहे. त्यासाठी स्वत:वर थोडीशी बंधनं लादून घ्यायलाच हवीत. त्याशिवाय काही छोटे छोटे सावधगिरीचे फंडे आहेत, तेवढे सांभाळत राहिले तरी बरेचसे काम होऊन जाईल...
- डायटिंग करायचं म्हणजे लोणी, तूप खाणं टाळण्याकडे सगळ्यांचा कल असतो. हृदयविकाराचा धोका टाळायचा असेल तरीही लोणी, तूप दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पण वास्तवात फॅट असलेले हे पदार्थ खाल्ल्यामुळे हार्टअटॅक येत नाही. त्यामुळे हे पदार्थ खायला काहीच हरकत नाही. ऑलिव्ह ऑईलमध्येही फॅट असतातच. पण रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय मजबूत राखण्यासाठी ते उपयुक्त ठरते, असे अलाहाबाद येथील ‘नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या संशोधकांनी म्हटले आहे. म्हणून लसणाच्या दोन पाकळ्या खाऊनच दिवसाची सुरुवात करायला हवी. त्यामुळे कोलेस्ट्रॉल घटविण्यासाठी त्याचा फायदाच होईल.
- जे लोक दररोज किमान एकदा तरी सोडा पितात, मग तो डायट सोडा का असेना, पण सोडा प्यायल्याने हृदयविकाराची शक्यता किमान ५० टक्क्यांनी वाढते असं निदर्शनास आलंय. सोड्यामुळे पचनक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे हृदयविकार आणि डायबिटीस दोन्ही बळावतात. वारंवार सोडा प्यायल्याने शरीरात जादा कॅलरीज जाऊन वजनही वाढते. हृदयविकाराचा झटका येण्यासाठी सोडाही कारणीभूत ठरतो.
- धान्य योग्य प्रकारचे असले तरीही हृदयविकार लांब ठेवता येतो. त्यामुळे धान्य चांगल्या प्रतीचे असायला हवे. गव्हासारख्या काही धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हृदयाच्या मजबुतीसाठी ते योग्यच आहेत. त्याबरोबरच तांदूळ आहारात जास्तीत जास्त असलाच पाहिजे. ओट्स शरीरातील जादा कोलेस्ट्रोल घालवण्याचं काम नैसर्गिकरीत्या करतात. ओट्समुळे हृदयाचे कामही चांगल्या रीतीने चालते. म्हणून ओट्स खायलाच हवेत.
सौजन्य :- फुलोरा, सामना ०६०६१५
No comments:
Post a Comment