परदेशी जाण्याचा हेतू केवळ स्वत:ची प्रगती असतो. परंतु गरिबी, कुपोषण याबरोबरच अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या देशांमध्ये जाऊन व्हॉलेण्टरिंग करणं हे तसं मराठी माणसाला अद्याप माहीत नसलेलं क्षेत्र. सिद्धार्थ संख्ये, सुवर्णा हुलावळे, शरद पंत, सचिन पटवर्धन अशा काही मराठी युवकांनी ही मोहीम यशस्वी केली आहे. व्हॉलेण्टरिंग वोव्हरसीज (V.S.O.) या संस्थेमार्फत या तरुणांनी अफ्रिकन देशामधल्या खेड्यांमध्ये जाऊन व्हॉलेण्टरिंग केलं. अभिमान वाटावा अशीच यांची कामगिरी.
पश्चिम आफ्रिकेतल्या सिएरा लिओन देशात २०१०मध्ये व्हॉलेण्टरिंग केलेल्या अमरावतीच्या शरदनेही तिथल्या मटरू जॉग या छोट्याशा खेड्यात मच्छीमार आणि शेतकर्यांच्या व्यवसायाचं नियोजन करून त्यांना प्रशिक्षितही केलं. आसपासच्या १२ खेड्यांतील लोकांना त्याने मासे टिकवण्याच्या नव्या पद्धती तसेच मासेमारीसाठी आवश्यक असणार्या मोठ्या बोटी वापरण्याचं महत्त्व अभ्यासपूर्वक पटवून दिलं. आपल्या याच कामातून वेळ काढत तिथल्याच एका आफ्रिकन युथ या संस्थेतल्या मुलांना त्याने अनेक विषयांवर मार्गदर्शनही केलं. याबदल्यात ही मुलं शरदला तिथले लोकप्रिय खाद्यपदार्थ, आचके प्रेमाने करून आणायची आणि खिलवायची. तिथल्या स्थानिक मुलांना शरदने मार्शल आर्ट शिकवलं आणि बदल्यात फुटबॉलही शिकून घेतलं. व्हॉलेण्टरिंगच्या एका वर्षाच्या काळात शरदने तिथल्या लोकांच्या मनात स्थान तर निर्माण केलंच पण त्याचबरोबर तिथल्या गावप्रमुखाने त्याला इलोगिमा (stand still) ही पदवी दिली. सुरुवातीला शरद हा तिथल्या लोकांसाठी पुमै पुमै (गोरा माणूस) होता; पण नंतर हाच शरद त्यांचा जिवलग मित्र झाला.
सध्या ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’मध्ये कार्यरत असलेले सचिन पटवर्धन यांनी २०११मध्ये आफ्रिकेतल्या घाना देशात जाऊन व्हॉलेण्टरिंग केलं होतं. एका वर्षासाठी घानात गेलेल्या सचिन यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन ही संधी स्वीकारली. तिथल्या स्थानिक जिल्हा पंचायतीमध्ये व्यवसायिक उपक्रमांचे अभ्यासपूर्वक नियोजन आणि निश्चितीचं काम केलं. सचिन यांनी तिथंही प्रेमाची नाती तयार केली. सचिन म्हणतात की, महाराष्ट्राला थोर समाजसेवकांचा वारसा लाभलेला आहे. पण अशा प्रकारच्या जागतिक स्तरावरील समाजसेवेपासून मराठी माणूस अजूनही दूर आहे. देश, भाषा, संस्कृती यांच्या सीमा ओलांडून कुठल्याही व्यवसायिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता या तरुणांनी केलेली ग्लोबल समाजसेवा अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
व्हीएसओअनेक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्था परदेशात व्हॉलेण्टरिंग संधी देतात. vso ही त्यापैकीच एक संस्था. या संस्थेचे जगभरातील ४० देशांमध्ये काम चालते.
माफक स्टायपेण्डव्हॉलेण्टरिंगसाठी पदव्युत्तर व किमान ३ वर्षांचा अनुभव. इंग्रजी आणि किमान संगणकाचे ज्ञान या पात्रता आवश्यक आहे. या बदल्यात विमान भाडं, राहाण्या-खाण्याची सोय आणि माफक स्टायपेंड संस्थेकडून व्हॉलेण्टीयर्सला दिला जातो.
- स्वप्नाली अभंग
SABHAR :- FULORA, SAMANA १५०२१४
No comments:
Post a Comment