मोबाईलच्या क्रांतीमुळे कॅमेरा ही आता क्षुल्लक गोष्ट असली तरी अनेक सोनेरी क्षण टिपून घेण्यासाठी कॅमेरा हवा असतो. फोटोग्राफीतील तंत्रज्ञानात झालेल्या आमूलाग्र बदलांमुळे आता लहान मुलेदेखील सहजपणे फोटो काढू शकतात. डिजिटल कॅमेर्याच्या नवीन तंत्रज्ञानामुळे फोटोग्राफीचा छंद कोणीही जोपासू शकतो. या लेखात आम्ही तुम्हाला सध्या बाजारात असलेल्या लेटेस्ट कॅमेर्यांची माहिती देत आहोत. त्यांच्यातील वैशिष्ट्यांवर आधारित रेटिंग्जही दिले आहेत. त्यावरून तुम्हाला तुमचा कॅमेरा सिलेक्ट करता येईल.
सो गेट रेडी फॉर फोटो शूट ऍण्ड ‘से चीज!’
डिजिटल कॅमेर्यामध्ये जुन्या कॅमेर्याच्या तुलनेत असंख्य नवीन वैशिष्ट्ये आहेत. त्यातील काही प्रमुख वैशिष्ट्यांवर डिजिटल कॅमेरा घेताना लक्ष ठेवावे लागते.
- रिझुल्युशन : रिझुल्युशन म्हणजेच फोटोची स्पष्टता. जेवढे जास्त पिक्सेल तेवढेच जास्त रिझुल्युशन कॅमेर्याच्या मेगा पिक्सेल रिझुल्युशनवरून ठरते. त्यामुळे 1 मेगा पिक्सेलच्या कॅमेर्यापेक्षा 5 मेगा पिक्सेलच्या कॅमेर्यामध्ये तुम्हाला जास्त स्पष्टता व मोठी फोटोसाईज मिळू शकते.
- ऑप्टिकल झूम : फोटोची स्पष्टता वाढविण्यासाठी ऑप्टिकल झूम हा महत्त्वपूर्ण घटक आहे. ऑप्टिकल झूम अर्थात झूम लेन्सेस ज्याचा वापर करून फोटो काढला जातो. जेवढी जास्त ऑप्टिकल झूम तेवढीच जास्त फोटोची वैविधता आपणास मिळू शकते.
- फ्लॅश : आजकालच्या बहुतांशी डिजिटल कॅमेर्यांमध्ये फ्लॅश इन बिल्टच असतो, पण डिजिटल कॅमेरा घेताना ‘‘रेड आय रिडक्शन’’ हे वैशिष्ट्य असणारा डिजिटल कॅमेरा घ्यावा व गरज असल्यास एक्सटर्नल फ्लॅशचा पर्यायदेखील अजमावण्यास काहीही हरकत नाही.
- बर्स्ट मोड : म्हणजेच एकाच क्षेत्रात अनेक फोटो घ्यायचे अनोखे वैशिष्ट्य. याचा फायदा जर एखाद्या मोशनमध्ये असणार्या गोष्टीचा फोटो घ्यायचा असेल तर होतो. त्यामुळे तुम्ही एकाच वेळेस घेतलेल्या अनेक फोटोंपैकी चांगला आलेला फोटो निवडू शकता.
- एलसीडी स्क्रीन : आजकालच्या बहुतांशी डिजिटल कॅमेर्यांमध्ये मोठा एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. हवा तो फोटो आपण थेट या एलसीडी स्क्रीनमध्ये बघू शकतो. त्यामुळे पारंपरिक व्ह्यूफाईंडरचा वापर करण्याची गरज पडत नाही.
- यूएसबी कनेक्टिव्हिटी व जास्त क्षमतेचे मेमरी कार्ड असणे ही कोणत्याही डिजिटल कॅमेर्याची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात फोटो स्टोअर करू शकता व ते शेअरदेखील करू शकता.
Techno.savvy@live.com
सौजन्य:- इंद्रधनू, सामना.

No comments:
Post a Comment