- बेसन घालून अळूच्या पानांच्या वड्या करतात मात्र त्यात भरपूर मसाला आणि तेलाचा वापर करावा ज्यानेे वायुविकाराचा त्रास होत नाही मात्र त्याचे अतिरेकी सेवन टाळावे
- अळू रक्तपित्त, जुलाबात गुणकारी ठरते
- अळूच्या कोवळ्या पानांचा रस काढून त्यात जिरेपूड मिसळून प्यायला असता पित्तप्रकोप दूर होतो
- वायुमुळे पोटात गोळा उठल्यास अळूच्या देठासहित पाने वाफवून त्याचे पाणी काढून त्यात तूप घालून तीन दिवस प्यायला द्यावे
- अळूचा आहारात समावेश केल्याने स्त्रियांना अंगावर दूध चांगले येते
- अळूच्या पानांचा रस तीन-चार दिवस प्यायल्याने लघवीची जळजळ दूर होते
- अळूची देठे विस्तवावर जाळावी व त्याची राख फोडांवर लावल्यास फोड फुटून बरे होतात
- गांधीलमाशी चावल्यास अळू भाजून त्याचा रस दंशस्थानी लावावा तसेच पोटातही घ्यावा
- पोटात कृमी, जंत झाले असता रानटी अळूचा कंद जाळून त्याची राख मधातून चाटावी
- पोटात गुबारा धरुन शौचाला साफ होत नसल्यास लसणाची फोडणी दिलेली अळूची भाजी खावी
- मूतखडा, पित्ताशयामध्ये खडा असणार्यांनी अळूचे सेवन टाळावे अळू कधीही कच्च्या स्वरुपात खाऊ नये
सौजन्य:- चिरायू, सामना १४०७२०११.
No comments:
Post a Comment