Sunday, June 20, 2021

आदेश - अलख निरंजन

 वडील दर श्रावण महिन्यात "नवनाथ भक्तिसार" ग्रंथाचे पठण करीत असत. आणि, त्यांची खूप इचछा होती कि, नवनाथांची गाथा कोणत्या ना कोणत्या तरी चॅनेल वर किंवा कुणीतरी ह्यावर धारावाहिक किंवा चित्रपट तयार करावा. 


गेल्या वर्षी जेव्हा "सोनी मराठी" टीव्ही चॅनेल सुरु झाले तेव्हा मनात एक आशा निर्माण झाली होती, कि सोनी मराठी चॅनेलने नवनाथांवर धारावाहिक बनवली पाहिजे, कारण, सोनी टीव्ही चा इतिहास पाहता, एक गोष्ट लक्षात आली होती, ती म्हणजे धार्मिक धारावाहिक सादर करण्याची जी कला व तंत्रज्ञान सोनी कडे आहे, त्यामुळे बरेच ग्राहक ह्या धारावाहिक ना प्रचंड प्रतिसाद देतात. 


नवनाथांचा पण एक संप्रदाय आहे. जो भक्त नाथांचीच भक्ती करतो. पण, ह्या संप्रदायाने कधीही भक्तीचे बाजारीकरण केले नाही. किंवा, नवनाथांबद्दल सहसा कुठे ऐकायला मिळत नाही. पण, एक गोष्ट मात्र नक्की आहे, ज्यांनी, "नवनाथ भक्तिसार" ग्रंथाचे पठण वा श्रवण केले आहे, त्यांच्या मनात नाथांबद्दल एक शुद्ध श्रद्धा आहे. 


अर्थात, आता सोनी मराठी हि धारावाहिक सलग कथानकाच्या रूपाने सादर करते कि, लहान लहान कथांद्वारे सादर करते, हे बघणे औत्स्युक्याचे ठरेल. सलग कथानकाच्या रूपाने सादर केल्यास, धारावाहिकचा प्रभाव दर्शकांवर जास्त पडेल अशी आशा आहे. 

आता, अगदी मीडियाच्या भाषेत सांगायचे झाले तर ह्या कथानकात फँटसी पण आहे. तसेच, विज्ञानाला आव्हान देणाऱ्या काही घटना देखील आहेत. देवांना पण झालेला गर्व नाथांनी कश्या प्रकारे मोडीत काढला तेही आहे. ह्या कथानकातून काही नवीन शब्द पण दर्शकांना समजणार आहे. पुढील काही मुद्द्यांवरून ह्या कथानकाचे महत्व पटेल. 


१. नाथांनी स्त्रीच्या   पोटातून जन्म घेतलेला नाही. सर्व नाथांचा जन्म हा "अयोनी संभव" आहे. फक्त, मीननाथांचा जन्म हा आईच्या पोटातून झाला होता, पण नंतर घडलेल्या घटनेने त्यांचा पुनःजन्म हा "अयोनी संभव" आहे.


२. गोरक्षनाथ व जालिंदर नाथांच्या भेटीत झाडावरील आंबे पुन्हा झाडावर त्याच फांदीला जोडणे हि घटना विज्ञानाला आव्हान देणारी आहे.


३. गुरुभक्ती चे अतिउच्च दर्शन गोरक्षनाथांनी दिले आहे. आपल्या गुरूंना आवडणारे वडे आणून देण्यासाठी आपला डोळा त्यांनी दान केला होता. 


४. पूर्वी स्त्री राज्य होते, व त्याचे रक्षक श्री बजरंगबली होते. आणि, ह्याच बजरंग बळींना दोन्ही नाथांनी हरवले होते. 


५. जगदंबा मातेला झालेला गर्व पण मच्छिन्द्रनाथांनी मोडीत काढला होता. 


६. सावत्र आईने मुलाला हात पाय कापून एक तप एकाच जागी चौरंगी करून बसवले होते, तेच पुढे चौरंगीनाथ म्हणून नावारूपास आले.


७. भर्तरीनाथांना प्राण्याची भाषा कळत असे. 


८. अर्जुनाचे स्त्री रूप सर्वाना ठाऊक आहे, पण गोरक्षनाथांनी आपल्या गुरूंना स्त्री राज्यातून परत आणण्यासाठी घेतलेले स्त्री रूपाचे महत्व खूप मोठे आहे. 


९. कानिफनाथांनी आपल्या गुरूंना जमिनीत कुठे पुरले होते, हे शोधून काढलेले आहे. 


१०.  वटसिद्धनागनाथानी एका ब्राह्मणाच्या बारा मुलांचे प्राण यमाकडून परत आणले आहेत. 


११. गहिनीनाथांचा जन्म हा मातीच्या पुतळ्यातून झालेला आहे. 

"अनुग्रह", "अयोनी संभव", "आदेश", "संजीवनी मंत्र"  अश्या अनेक  नवीन शब्दांचा अर्थ  दर्शकांना समजणार  आहे. 

"गाथा नवनाथांची" ह्या धारावाहिक चे सादरीकरण प्रेक्षकांना आवडले तर, काही दर्शकांचे श्रद्धास्थान  बदलण्याची शक्यता आहे. कारण, ह्यातील प्रत्येक नाथांचे स्वतःचे एक अस्तित्व आहे, व नवनाथांचे    एक वेगळे अस्तित्व आहे. 

आज वडील असते तर हि  धारावाहिक बघतानाच आनंद द्विगुणित  असला असता.

- अलख निरंजन  

Sunday, January 31, 2021

"एयरटेल सेफ पे" - बँकिंग क्षेत्रातील एक नवीन क्रांती.

 


जेव्हा मार्केट मध्ये कोणत्याही प्रकारचे वॉल्लेट पेयमेन्ट नव्हता, तेव्हा खूप वर्षांपासून पासून एयरटेल  ने "एयरटेल मनी" हि सेवा सुरु केली होती. आम्ही साल २००३ पासून एयरटेल चे ग्राहक आहोत.  आणि, आम्ही ती सेवा तेव्हापासून वापरात आहोत. त्यानंतर, कालानुरूप बदल होत गेले. बरेचसे पेयमेन्ट वॉल्लेट बाजारात आले. त्यानंतर, हल्लीच पेयमेन्ट बँक पण अस्तित्वात येण्यास सुरुवात झाली. त्यासोबत, हॅकर्स पण निर्माण झाले. एयरटेल ला पण "पेयमेन्ट बँक" चे लायसन्स मिळाले. एक ग्राहक म्हणून, आम्ही नमूद करतो कि, एयरटेल पेयमेन्ट बँक मध्ये जेवढ्या सुविधा आहेत, त्या इतर कोणत्याही बँक अँप, पेयमेन्ट अँप, अगदी गूगल पे मध्ये सुद्धा नाहीत. 

सर्व डिजिटल ट्रांसकशन करणाऱ्या संस्थांनी द्वि स्तरीय सुरक्षा ऑनलाईन ग्राहकांसाठी तयार केली होती. म्हणजे, पासवर्ड व ओ टी पी , किंवा पासवर्ड व डेबिट कार्ड ग्रीड. पण, एयरटेल पेयमेन्ट बँक ने बँकिंग क्षेत्रात फार मोठी क्रांती घडवत जानेवारी २०२१ महिन्यात अजून एक सुरक्षा पायरी आणलीय. "एयरटेल सेफ पे".  

"एयरटेल सेफ पे" मध्ये तुम्ही पासवर्ड टाकलात, ओ टी पी टाकलात तरी सुद्धा परत एक कॉन्फीर्मेशन मेसेज येतो, "yes OR no". जर, तुम्ही "नो" दाबला तरी पैसे तुमच्या खात्यातून जाणार नाहीत. 

त्यामुळे, ज्या ग्राहकांनी एयरटेल बँक खाते उघडले आहे, त्यांनी त्वरित आपल्या जवळील एयरटेल अधिकृत सेन्टर ला भेट देऊन आपले "सेफ पे" सिम घ्या. व तुमच्या एयरटेल बँक खात्याला त्री-स्तरीय सुरक्षा द्या. 

"एयरटेल सेफ पे" बँकिंग क्षेत्रातील एक नवीन क्रांती. 

Hi! I am sending you discount coupons worth Rs. 50 for your next recharge or bill payment. Sign up on the Airtel Thanks App using my link to claim the coupons.


What's more, if you’re an Airtel prepaid customer, you get FREE 2 GB data on your first time sign-up.


Recharge, Pay bills, Track your data balance, Get Help & Support and Watch live TV on the Airtel Thanks App. Hurry, get started now! 

http://u.airtel.in/YMPhOX 


(एक ग्राहक म्हणून आलेला अनुभव आम्ही शेयर केला आहे)

Saturday, March 21, 2020

चांगल्या सवयी. Good Habits.

मानवी स्वभावच असा आहे कि, त्याला एखादी चांगली गोष्ट सांगितली तरी, त्याचा अहं त्याला ती गोष्ट सहज स्वीकारण्यापासून परावृत्त करत असतो. पण, जेव्हा एखादी इमर्जन्सी, किंवा एखादी घटना घडते तेव्हा त्या चांगल्या गोष्टी मानव स्वीकारायला सुरुवात करतो. आणि, हेच चांगल्या सवयींबाबत देखील घडते.

आता, कोरोना संकट पासून वाचण्यापासून ह्याच चांगल्या गोष्टींचे महत्व अधोरेखित होत आहे.

१. हात साबणाने स्वछ धुवा.
२. शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल किंवा टीसु पेपर धरा.

आता, चेहऱ्याला वारंवार हात न लावणे हे तरी चष्मा असणार्याना प्रॅक्टिकली शक्य नाही. तरी, पण एक ग्राहक व वापरकर्ता (यूजर) म्हणून काही गोष्टी आम्ही स्वतःहून वर्षानुवर्षे करत आहोत. एक नागरिक म्हणून, आम्ही त्या तुमच्या बरोबर शेयर करत आहोत. ह्यात, कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करणे हा उद्देश नाही. तसेच, सुचवलेली औषधें हि तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

१. रोज सकाळी आंघोळीच्या एक बालदी कोमट पाण्यात फक्त दोन थेंब निलगिरी तेल टाका. ह्याचा वास खूप तीव्र आहे. जो न्हाणी घरात दरवळतो. त्यामुळे, न्हाणी घरात कोरोना ला आळा बसू शकतो. ह्या पाण्याने अंघोळ केल्यावर आपल्या शरीराला निलगिरी चा वास येत नाही. तसेच, शरीरावर असणाऱ्या जंतूंचा नायनाट होण्यास पण मदत होते. घरात गोमूत्र शिंपडावे.

२. घरातील जमीन पुसताना एका बादलीत एक चमचा डेटॉल टाकावे. त्यामुळे, जमिनीवर असणारे जीवजंतूं कमी होण्यास मदत होते.

३. घरात पाच वर्षांवरील लहान मुले असतील तर, पतंजली कफ सिरप ची बाटली कायम घरात ठेवावी. तसेच, सर्वानी रोज आवळा सिरप व कोरफडीचा एक चमचा रस रोज प्यावा. त्याने शरीराची प्रतिकार शक्ती कायम राहण्यास मदत होते.

४. कधी हलका ताप वाटला तर घरात नेहमी सिप्ला कंपनीची "निसिप प्लस" Nicip Plus हि गोळी ठेवावी. मात्र, एक एक गोळी सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी घेऊनही ताप उतरत नसेल तर थेट डॉक्टर कडे जावे.

५. ज्यांच्यामध्ये पूर्व आजार किंवा पूर्वी डेंगू झाला असेल किंवा ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी दर रविवारी एक चमचा पपई च्या पानाचा रस प्यावा. घरातील सर्व मंडळी पण घेऊ शकतात. हा रस शरीरातील लाल पेशी वाढविण्यास मदत करतो.

६. संध्याकाळी घरात दिवेलागणीच्या वेळी, प्रत्येक खोली मध्ये कापूर, धूप लावावे. जेणेकरून, घरातील वातावरण शांत व प्रसन्न राहते. तसेच, सांज कीटकांना घरात घुसण्या पासून मज्जाव होतो.

७. रात्री झोपताना उघडे असणाऱ्या शरीरास ओडोमॉस क्रीम लावून झोपावे. कृपया, चेहऱ्यास लावू नये.

८. रात्री झोपताना घराच्या सर्व कोपऱ्यात, मोठ्या वस्तू कपाट वगैरे च्या मागे, पलंगाखाली बेगॉन स्प्रे करावे. आणि चिंतामुक्त झोपी जावे.


वरील प्रमाणे, दैनंदिनी अनुसरण केल्यावर देखील जर एखाद्या असाध्य रोगाची लक्षणे किंवा, सर्दी ताप खोकला झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा. आपण वापरत असलेल्या उत्पादनांची, औषधांची  अंतिम तारीख सतत बघावी.

Friday, February 28, 2020

प्रतीक्षा सूची प्रकार Type of Waiting List

सामान्य प्रवाशांना रेल्वे ची प्रतीक्षा सूची एकच वाटते। पण, त्यात वेगवेगळे प्रकार आहेत। (GNWL, RLWL वगैरे). आम्ही रोज एका संज्ञेबद्दल माहिती देऊ।📝
Common passengers of Rail feels that there is only one type of Wait list. But it has different types. (RLWL, TQWL) We will update on one concept everyday.  📝

प्रतीक्षा सूची प्रकार :-
Type of Waiting List :-

१. जनरल वेटिंग लिस्ट म्हणजे काय ?
जे प्रवासी ट्रेन ज्या मूळ स्थानकातून सुटणार आहे, किंवा त्याजवळील स्टेशन वरून चढण्याचे बुकिंग करतात, त्यांना जनरल वेटिंग लिस्ट तिकीट दिले जाते. हि प्रतीक्षा सूची सर्व सामान्यतः असते. आणि, ह्या प्रतीक्षा सूची मध्ये तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते.

1. What is GNWL?
General Waiting List (GNWL) waitlisted tickets are issued when the passenger begins his/her journey at the originating station of a route or stations close to the originating station. This is most common type of waiting list and has got the highest chances of confirmation.                    © APB

२. रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट म्हणजे काय ?
रिमोट लोकेशन प्रतीक्षा सूची म्हणजे मार्गावरील  मधल्या स्टेशन साठी दिले जाणारे तिकिटं। (सुरुवातीच्या व शेवटच्या स्थानक   व्यतिरिक्त), कारण ही त्या मार्गावरील खूप महत्त्वाची शहरे असतात। ह्या तिकिटना वेगळी प्राथमिकता दिली जाते। आणि, ह्याची कॉन्फिर्मेशन हे त्या मधल्या थांब्याला होणाऱ्या रद्दीकरणावर अवलंबून असते। रिमोट लोकेशन वरील स्थानके स्वतःचे चार्ट ट्रेन सुटणाच्या दोन तीन तास अगोदर बनवतात। अश्या प्रकारच्या प्रतीक्षा सुचितील तिकिटं नक्की होण्याची शक्यता खूप कमी असते।

2. What is RLWL?
Remote Location Waiting List (RLWL) means ticket is issued for intermediate stations (between the originating and terminating stations) because usually these are the most important towns or cities on that particular route. This type of tickets will be given a separate priority and confirmations will depend on the cancellations of a destination confirmed ticket. Remote location stations prepare there own chart 2-3 hours before the actual departure of train. For this type of ticket there are less chances of confirmation.
===========
उदा. मंगला एक्सप्रेस दिल्ली ते एर्नाकुलम धावते। पण, कल्याण ते कणकवली तिकिटांचा चार्ट हा कल्याण ला बनतो। 🚂
Eg. Mangla Express runs from Delhi to Ernakulam. But, the Chart of Kalyan - Kankavli is being prepared by the Kalyan station. 🚂

 ३. पुलिंग कोटा प्रतीक्षा सूची म्हणजे काय ?
ही सूची वेगवेगळ्या छोट्या स्थानकांकडून शेयर केली जाते। पूल कोटा हा सुरुवातीच्या स्थानकांकडून सुरू होतो व पूर्ण मार्गावर एकचं पूल कोटा असतो।
पूल कोटा हा सुरुवाती पासून मधल्या स्थानका पर्यंत किंवा मधल्या स्थानकापासून शेवटच्या स्थानका पर्यंत किंवा दोन मधल्या  स्थानकांसाठी असतो।

3. What is PQWL?
A Pooled Quota Waiting List (PQWL) is shared by several small stations. Pooled Quotas normally operate only from the originating station of a route, and there is only one Pooled Quota for the entire run. The Pooled Quota is generally allotted for passengers travelling from the originating station to a station short of the terminating station, or from an intermediate station to the terminating station, or between two intermediate stations.

४. रिमोट लोकेशन सामान्य प्रतीक्षा सूची म्हणजे काय ?

ही प्रतीक्षा सूची तिकिटं बुक केल्यावर त्या ग्राहकांना दिली जाते, जिथे प्रतीक्षा सूची प्रकार हा रिमोट लोकेशन प्रतीक्षा सूची असतो। ह्याचा अर्थ तिकिटं बुक केल्यावर रिमोट लोकेशन प्रतीक्षा सूची चे नाव आपोआप रिमोट लोकेशन सामान्य प्रतीक्षा सूची होते।

4. What is RLGN?
Remote Location General Waiting List (RLGN) is issued when a user books a ticket where WL quota is RLWL. This means after ticket booking RLWL gets named as RLGN.


Thursday, November 07, 2019

प्रधान मंत्री जन आरोग्य योजना PMJAY

प्रधान मंत्री जन आरोग्य योजना - 👨🏻‍⚕
अंतर्गत ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांना इ कार्ड देण्यात येत आहे. ज्यात रु. ५/- लाख पर्यंतचा आजारांचा खर्च सरकार करणार आहे. तर ते कोणते आजार ह्या योजनेखाली येतात त्याची हि यादी. जर कुणी हे मेडिकल शब्द मराठीत भाषांतरित करून सांगितले तर बरं होईल. 📎

PMJAY - 👩🏻‍⚕
Under this Scheme, the Senior Citizens in Rural Area are getting E-Card. The Hospitalisation Expenses upto Rs. 5/- Lakh for listed Diseases will be covered under this Scheme. The List of Diseases are given hereunder. If anyone can translate this List in Marathi, it will be useful for many people. 📎






प्रधान मंत्री जन आरोग्य योजना -
ह्या योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलची यादी पुढील प्रमाणे. तुमच्या  राज्यातील व जिल्ह्यातील हॉस्पिटल शोधण्यासाठी खालील लिंक वर टिचकी मारा. (पालघर जिल्ह्यातील हॉस्पिटल सध्या ठाणे जिल्ह्यातच दाखवत आहेत.     👨‍⚕


PMJAY -
The hospitals that are available in the Sindhudurg District are listed below. To search your hospital in your state and district, plese click on this link. The Hospitals in the Palghar Distrct are still listed under Thane District. 👩‍⚕ 

https://hospitals.pmjay.gov.in/Search/empnlWorkFlow.htm?actionFlag=ViewRegisteredHosptlsNew





सौजन्य - आयुष्मान भारत योजना

Tuesday, September 10, 2019

बजाज फिनसर्व चे पॉकेट इन्शुरन्स

बजाज फिनसर्व ने ग्राहकांच्या दैनंदिन उपयोगात येणाऱ्या सेवा, उत्पादने ह्यांचे  इन्शुरन्स दिले आहे. बघा, पूर्ण यादी.
१. चावी रिप्लेसमेंट इन्शुरन्स
२. वॉल्लेट काळजी
३. हॉस्पिटल कॅश कव्हर
४. डोळ्यांची काळजी 
५. रोड ट्रिप कव्हर
६. पर्स कव्हर
७. साहस कव्हर
८. ए टी एम चोरी
९. बॅकपॅकिंग ट्रॅव्हल कव्हर
१०. बॅगेज इन्शुरन्स
११. सी सी टी वि कॅमेरा कव्हर
१२. सायकल इन्शुरन्स
१३. दिल्ली मेट्रो इन्शुरन्स
१४. डेंगू कव्हर
१५. डिज़ाइनर कपडे इन्शुरन्स
१६. डोमेस्टिक हॉलिडे कव्हर
१७. डी एस एल आर कॅमेरा इन्शुरन्स
१८. इलेक्ट्रॉनिक स्टेशनरी इन्शुरन्स
१९. फायर क्रॅकर इन्शुरन्स
२०. फिटनेस वेअरअबल इन्शुरन्स
२१. फ्रॅडूलेन्ट  चार्जेस कव्हर
२२. ग्रुप जीवन सुरक्षा
२३. जिम इंज्युरी इन्शुरन्स
२४. हॅण्डहेल्ड इ रिडींग डेव्हिसेस इन्शुरन्स
२५. हेल्मेट इन्शुरन्स
२६. होम इन्व्हर्टर इन्शुरन्स
२७. होम प्रोटेक्शन कव्हर
२८. हनिमून हॉलिडे कव्हर
२९. आयडेंटिफाय थेफ्ट कव्हर
३०. इन्फेकशन कव्हर
३१. किडनी स्टोन इन्शुरन्स
३२. लॅपटॉप चार्जेर इन्शुरन्स
३३. लेह लडाख रोड ट्रिप कव्हर
३४. लक्जरी सॅनिटरी फिटटींग्स इन्शुरन्स
३५. मेनिंगोकॉकचाल मेनिंगटीस कव्हर
३६. मोबाईल चार्जेर इन्शुरन्स
३७. मोबाईल चार्जेर इन्शुरन्स
३८. मॉर्निंग वॉल्क अपघात इन्शुरन्स
३९. मुंबई मेट्रो इन्शुरन्स
४०. मुंबई पुणे गोवा रोड ट्रिप कव्हर
४१. मुंबई पुणे रोड ट्रिप कव्हर
४२. मुजिकल इन्स्ट्रुमेंट इन्शुरन्स
४३. पेन इन्शुरन्स
४४. पिलग्रिमेज   कव्हर
४५. प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन कव्हर
४६. प्राईस प्रोटेक्शन कव्हर
४७. पुणे गोवा रोड ट्रिप कव्हर
४८. पर्चेस प्रोटेक्शन कव्हर
४९. शूज इन्शुरन्स
५०. स्मॉल गॅजेट इन्शुरन्स
५१. सोलो ट्रॅव्हलर कव्हर
५२. स्पोर्ट फिटनेस इंज्युरी कव्हर
५३. स्टॅम्पएड  इन्शुरन्स
५४. ट्रेक कव्हर
५५. तुबेरकलोसिस  कव्हर
५६. वैष्णो देवी टेम्पल पिलग्रिमेज कव्हर
५७. वॉच इन्शुरन्स
५८. वॉटर प्युरीफिर इन्शुरन्स
५९. वॉटरबॉर्न डिसीज कव्हर
६०. वेडडींग ड्रेस इन्शुरन्स
६१. वीकएंड गेटवे रोड ट्रिप कव्हर
६२. विंटर ट्रेक कव्हर
६३. वायरलेस हेडफोन्स इन्शुरन्स
 अधिक माहितीसाठी, टर्म्स व कंडिशन साठी खालील लिंक वर क्लीक करा. ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध.
Bajaj Finserv has brought Pocket Insurance for the products and services that are being daily used by the Customers. For more info, click.
Pocket Insurance पॉकेट इन्शुरन्स

Thursday, August 08, 2019

जगप्रसिद्ध अगरबत्ती एका क्लिक वर !!

बाजारात तर भरपूर कंपन्यांच्या अगरबत्ती मिळतात। पण, वर्तमानपत्रात पण ज्या अगरबत्ती बद्दल लेख येतो व आरोमा थेरपी ने समृद्ध असलेली, ती एकमेव अगरबत्ती आहे, "राम भरोसे".
ह्या सणासुदीला आपले घर परिसर सुगंधाने प्रफुल्लित करण्यासाठी, आणि, तुमच्या सोयीनुसार व आवडणारा सुगंध थेट ऑनलाइन ऑर्डर देण्यासाठी, पेयमेंट करून घरपोच मिळण्यासाठी इथे टिचकी मारा
जगप्रसिद्ध "रामभरोसे" अगरबत्ती   ची किंमत ⤵
नवीन ग्राहकांनी अनुभव घेण्यासाठी
प्रति १०० ग्राम ₹ ८०/-
नाथ,
इथे क्लीक करा।
Nath 100 Grams

नियमित ग्राहकांनी दर दोन महिन्यांनी ऑर्डर करण्यासाठी।
प्रति २५० ग्राम १७५/-
नाथ,
इथे क्लीक करा।
Nath 250 Grams

नियमित ग्राहकांनी दर चार  महिन्यांनी ऑर्डर करण्यासाठी /
कॉम्बो १०० ग्राम चे ५ सुगंध ₹ ४००/- मध्ये ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा।
Combo 5 of 100 Grams

नियमित ग्राहकांनी दर सहा महिन्यांनी ऑर्डर करण्यासाठी /
कॉम्बो २५० ग्राम चे ५ सुगंध ₹ ८७५/- ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा।
Combo 5 of 250 Grams

तुम्ही स्वतः ऑनलाईन ऑर्डर व पेमेंट करू शकता। वरील लिंक मध्ये पूर्ण माहिती भरा।

किंवा आम्हाला गूगल पे किंवा बँक द्वारे पेयमेंट करा। आम्ही तुमची ऑर्डर थेट कंपनीकडून घरपोच करू।

ऑर्डर व पेयमेंट केल्यावर कृपया पिंग करावे । अधिक माहितीसाठी संपर्क व वॉट्सअप्प ७३८७२४९५२५.

Thursday, July 18, 2019

मुंबई लोकल ट्रेन प्रवासी विमा

Mumbai Local Train Passenger Insurance.

वाह ! मुंबई लोकल ट्रेन 🚄ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पण आरोग्य इन्शुरन्स उपलब्ध आहे. बजाज फिनसर्व ह्या कंपनीने हि सुविधा दिलेली आहे. ३६५ दिवसांसाठी चे रु. १,००,०००/- चे कव्हर फक्त रु. ३९९/- मध्ये. पोलिसी ची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :-
🔹१. जर ट्रेन अपघातात मृत्यू झाला तर रु. १,००,०००/- तुमच्या नॉमिनी ला मदत म्हणून मिळतील.
🔹२. जर ट्रेन अपघातात अपंगत्व आले, ज्यामुळे तुमचे उत्पन्न बुडत असेल तर रु. २०००/- प्रति आठवडा मिळतील.
🔹३. व्यक्ती ज्या १८ वर्षाखालील व ७० वर्षाच्या वरचे असतील त्यांना हि पोलिसी लागू नाही.
🔹४. मुंबई लोकल ट्रेन व्यतिरिक्त झालेल्या अपघातासाठी हि पोलिसी लागू नाही.
पोलिसी क्लेम करण्यासाठी खालील पैकी कोणत्याही एका पद्धतीने कॉन्टॅक्ट करू शकता. 

Wow ! Now Mumbai Local Train 🚄Travellers can avail the Health Insurance as Commuters in just Rs. 399/- for 365 days with the Cover of Rs. 1/- Lakh. The Bajaj Finserv has offered this insurance. The features are as follows :-

Although the local trains are considered the lifeline of commuters in Mumbai, there is always a higher risk of accidents, or any other unforeseen events. If you’re looking to protect yourself against such risks, get coverage with Mumbai Local Train Cover from Bajaj Finserv.

🔹1. In the event of your demise due to an accident on a Mumbai local train, your nominees get up to Rs. 1 lakh to help provide for them.
🔹2. In the event of disability due to injuries sustained on a Mumbai local train, you are covered against loss of income, for Rs. 2000 per week.
🔹3. Individuals below 18 years and above 70 years of age are not eligible.
🔹4. Any expenses incurred due to accidents other than while traveling on Mumbai local trains will not be covered.
You can lodge a claim under your Mumbai Local Train Insurance policy by contacting us through one of the following ways:

• E-mail – customercare@bajajallianz.co.in📩
• Toll free number - 1800-209-1021📱

For Online application, click here. 📝
https://www.bajajfinserv.in/pre-approved-mumbai-local-train-cover-application-form
====================
The above info is complied by
https://www.bajajfinserv.in/ 💻
ई-मेल - customercare@bajajallianz.co.in 📩
टोल फ्री क्र. - १८००-२०९-१०२१ 📱
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करावे. 📝
https://www.bajajfinserv.in/pre-approved-mumbai-local-train-cover-application-form 

====================
वरील माहिती हि एका प्रवाशाने सर्व प्रवाशांसाठी संकलित केली आहे. अधिक माहिती साठी कंपनी ची वेबसाईट आहे.
https://www.bajajfinserv.in/ 💻

Monday, July 15, 2019

एफ डी (फिक्स्ड डिपॉजिट) चैन अपडेट


आम्ही दिलेली एफ डी गुंतवणूक चैन एवढी प्रसिद्ध झाली कि, त्यामुळे खास करून ज्यांनी गृह कर्ज घेतले आहे, त्यांनी एफ डी चैन मोठ्या प्रमाणावर उपयोगात आणली. त्यांनी गृहकर्जाच्या इन्शुरन्स घेण्याऐवजी तीच रक्कम एफ डी मध्ये गुंतवायला सुरुवात केली.  व आता एफ डी मॅचुर झाल्यावर मिळणारी रक्कम गृहकर्ज फेडण्यास उपयोगात आणू लागले. ज्यामुळे, एकीकडे लोकांना एफ डी वर व्याज पण मिळाले, आणि त्या समोर गृहकर्जाच्या व्याजाचा भार पण कमी झाला. तर, दुसरीकडे आता गृहकर्ज कमी झाल्यामुळे गृहकर्जाची इ एम आय व मुदत देखील कमी होण्यास मदत होत आहे.

गुंतवणूक करण्यासाठीच्या लेखात आम्ही तुम्हाला एच डी एफ सी लिमिटेड व महिंद्रा फिनान्स ह्या दोन संस्थांबद्दल ज्या तेव्हा सर्वात जास्त व्याज दर देत होत्या, त्या बद्दल सांगितले होते. आता, एक अपडेट असा आहे कि, एच डी एफ सी लिमिटेड मध्ये ऑनलाईन काढलेल्या फिक्स्ड डिपॉजिट ची रक्कम मॅच्युरिटी तारखे दिवशी ऑटोमॅटिक क्रेडिट येत नाही, जशी आय डी बी आय मध्ये येते. त्यासाठी, तुम्हाला एच डी एफ सी मध्ये जाऊन एफ डी पावती व इतर पुरावे जमा करावे लागतात, मग त्याच दिवशी एफ डी रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होते.

ह्या उलट, महिंद्रा फिनान्स च्या ऑनलाईन एफ डी ची रक्कम मॅच्युरिटी तारखे दिवशी आपोआप आपल्या बँक खात्यात जमा होते. आणि, महिंद्रा फिनान्स चा सध्याचा व्याज दर हा सर्वात जास्त आहे.

आणि, महिंद्रा फिनान्स मध्ये रु. ५०००/- पासून पण गुंतवणुकीचे ओपशन आहेत. पण, रु. १००००/- ची गुंतवणूक ठेवणे बरे पडते. तीच, बजाज फिनान्स मध्ये किमान गुंतवणूक रक्कम रु. २५०००/- आहे. 

कदाचित, पूर्ण भारतात सर्व आर्थिक संस्थांमध्ये  ह्या एफ डी चैन मध्ये गुंतवणूक एवढी वाढली असेल कि, सरकारला होम लोन इन्शुरन्स ला उत्तेजना देण्यासाठी, आयकर कलमांखाली वजावट ह्या बजेट मध्ये द्यावी लागली असेल.

तेव्हा, सर्वाना उपयुक्त व सुरक्षित गुंतवणुकीचे माध्यम असलेली हि एफ डी चैन अनुसरायला काहीच हरकत नाही.
====================
वरील लेख हा स्व-अनुभवावर आधारित आहे. कृपया, कोणतेही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण विचार करावा. 

Monday, June 03, 2019

महानगर गॅस पाईप कनेक्शन

महानगरचा पाईप लाईन गॅस कनेक्शन (पी एन जी) अगदी बिल्डिंग जवळ आले आहे. म्हणूनच, म्हटलं थोडं बघूया काय प्रोसिजर आहे ते. ग्राहक तीन प्रकारच्या कॅटेगोरीत ऑनलाईन अर्ज भरू शकतात.⛽

१. ज्या बिल्डिंग मध्ये पाईप गॅस अगोदर पासून आहे.

2. ज्या बिल्डिंग मध्ये पाईप गॅस नाही आहेत ते. (ह्या बाबतीत सोसायटी एन ओ सी पण आवश्यक आहे).

३. ज्या बिल्डिंग च्या जवळून पाईप गॅस काँनेक्शन गेले आहेत ते.

अर्जा सोबत रु. ६६३५/- भरणे आवश्यक आहे. त्यातील रु. ५७५०/- रिफंडबल आहेत. हा ब्रेक अप दाखवणारा चार्ट सोबत जोडला आहे.

अर्ज सादर केल्यावर महानगर गॅस चे ऑफिसर्स व्हिजिट करतात व काँनेकशन देणे फिजिबल आहे का ते स्टडी करतात. जर काँनेक्शन देणे शक्य नसेल तर रु. ६६३५/- ऑनलाईन मार्फत पूर्णतः रिफंड केले जातात.






आता थोडा महानगर गॅस च्या डोमेस्टिक बिलिंग चा अंदाज घेऊ या. महानगर गॅस हा एस सी एम (SCM) ह्या परिमाणात मोजला जातो. ह्यांचे बिलिंग सायकल दोन महिन्याचे (६१ दिवसांचे) आहे.
आपल्या कडे जो लाल डब्बा सिलेंडर येतो त्याला एल पी जी म्हणतात. तो जवळ जवळ १५ किलो चा असतो. म्हणजे, दोन महिन्याला आपल्याला ३० किलोग्राम  सिलेंडर लागतो, ५ व्यक्तींच्या कुटुंबासाठी.
म्हणजे, १ एस सी एम = ०.७६ किलोग्रॅम.
म्हणजे, दोन महिन्यात ३० किलोग्राम = २२ एस सी एम.
महानगर गॅस ची बिलिइंग पद्धत हि इनकम टॅक्स सारखी प्रतिस्लॅब प्रमाणे आहे.
१. पहिल्या ३६.६० एस सी एम करिता रेट रु. २१.९६/- आहे.
२. पुढील ५४.९० एस सी एम करिता रेट रु. २६.०१/-  आहे.
३. त्या पुढील एस सी एम करिता रेट रु. ३३.३६/- आहे.
म्हणजे, ह्या स्लॅब नुसार आपले २२ एस सी एम चे बिल म्हणजे ६१ दिवसांचे बिल २२ * रु. २१.९६ = रु. ४८३/- + जीएसटी येणार. 🧾
समजा, जर कुणी ९९ एस सी एम गॅस वापरला तर त्याचे बिल रु. २४७५/- + जीएसटी येणार. कसे, ते दर्शविणारा तक्ता सोबत जोडला आहे.















आता, ह्यात एक बाब नोंद घेण्यासारखी आहे, ती म्हणजे, इलेक्ट्रिक मीटर प्रमाणे गॅस मीटर असणार. त्यामुळे, मीटर किती जोरात धावेल ते आपल्याला समजणार नाही. अर्थात, बिलिंग दृष्ट्या सुटसुटीत वाटत असले तरी बदलापूर ग्राहकांना कसा अनुभव येतो ते पाहावे लागेल. आणि, मग च निर्णय घेणे उचित ठरेल. 🤔

धन्यवाद. एका ग्राहकाने केलेले निरीक्षण. 🧐


महानगर गॅस बद्दल इंग्लिश मधील संपूर्ण माहिती साठी https://www.mahanagargas.com/ ह्या वेबसाईट ला भेट द्या.


Wednesday, May 22, 2019

ओनरशिप (स्वतः चा) फ्लॅट - एक शाप.



आताच काही दिवसांपूर्वी सोसायटी आवारात बसण्यासाठी बाकडी लावण्यात आलीत. सोसायटी ची परवानगी न घेता थेट अशी बाकडी लावणे म्हणजे अतिक्रमण नाही का ? असाच गैर व्यवहार कायदेशीर मार्गाने जलवंती अपार्टमेंट, नवीन शिंदे आली इथे करण्यात आला आहे. रजिस्ट्रेशन क्र. TNA/AMB/HSG/(TC)/24025/2012-13. सोसायटी ला दोन वर्षे चेअरमन नसल्यामुळे इमारती मधील घाटकोपरला राहण्याऱ्या नगर सेवकाला सहा महिन्यासाठी चेअर मन बनविण्यात आले होते. सदर माजी चेअरमन नि  बरोबर जेव्हा अंबरनाथ निवडणूक कार्यालय कडून सोसायटी ची निवडणूक घेतली जाते, त्या दरम्यान गेली १३ वर्षे बंद असलेले सोसायटी चे गॅरेज  बिल्डर च्या संगनमताने परस्पर विकले. सोसायटी २०१२ सालापासून रजिस्टर आहे. त्या नंतर हि गॅरेज चा व्यवहार  बिल्डर करू शकले नव्हते. कारण, माजी सेक्रेटरी एक हाती बिल्डर विरुद्ध लढत होते. बिल्डर जेव्हडे गिर्हाईक पाठवायचा तेवढ्या गिर्हाईक ना हाकलून लावायचे. पण सोसायटी मधील सर्व सदस्यांनी हि बाब गांभीर्याने घेतली नाही. गॅरेज विकत घेणारा बिजनेसमॅन आहे. म्हणजे, ह्या त्रिकुटाने (नगरसेवक, बिल्डर, बिजनेसमॅन) बरोबर वेळ साधत गॅरेज ला फ्लॅट दाखवून परस्पर रेजिस्ट्रेशन केले. सोसायटी ची एन ओ सी न घेता. 
त्या बिजनेसमॅन ने तर आता सोसायटी मेंबर वर (आजी चेअरमन, आजी खजिनदार, दोन मेंबर) दादागिरी करत वीज मीटर पण फिक्स केला आणि गॅरेज वापरायला पण सुरुवात केली. 
सोसायटी ने सदर मेंबर ला अजून शेयर सर्टिफिकेट दिलेलं नाही.  म्हणजे, आज हि पैश्याने सामर्थ्यवान व राजकीय शक्ती असणाऱ्यांची गुलामगिरी सामान्य मेंबर्स ना करावी लागत आहे. आता काही प्रश्न निर्माण होतात ते असे -

१. महारेरा नुसार फक्त नोंदणी कृत प्रोजेक्ट चा व्यवहार होऊ शकतो, मग अनोंदणीकृत गॅरेज चा व्यवहार रजिस्टर करण्याची बिल्डर ची हिम्मत कशी झाली ?

२. रेजिस्ट्रार काय फक्त स्टॅम्प ड्युटी पेयमेन्ट वर रेजिस्ट्रेशन करून देतात ? असे व्यवहार रजिस्टर करताना महारेरा सर्टिफिकेट ची मागणी का करत नाहीत. ?

३. एकदा रजिस्टर झालेले डोकमेण्ट रेजिस्ट्रार परत कॅन्सल करू शकत नाहीत, अशी म्हणे कायद्यात तरतूद आहे ? मग, रेजिस्ट्रार रेजिस्ट्रेशन करण्यापूर्वी सोसायटी एन ओ सी का मागत नाहीत ?

४. महावितरण (वीज विभाग) फक्त अग्रीमेंट वर वीज जोडणी कशी देऊ शकतात ? ते सोसायटी एन ओ सी ची मागणी का करत नाहीत ?

५. मुनिसिपालिटी टॅक्स विभाग फक्त अग्रीमेंट वर टॅक्स नाव कसे बदलू शकतात ? ते सोसायटी एन ओ सी ची मागणी का करत नाहीत ?

६. आता सर्व डेटा (माहिती) ऑनलाईन मध्ये उपलब्ध आहे. मग रेजिस्ट्रार, महावितरण, मुनिसिपालिटी पाच मिनिटे खर्च करून सदर सोसायटी रजिस्टर आहे कि नाही हे चेक करू शकत नाहीत का ?

७. माननीय सुप्रीम कोर्ट च्या एका निर्णयानुसार गॅरेज हे सध्या राहत असलेल्या मेंबर ना कॉमन फॅसिलिटी म्हणून वापरण्यासाठी असते. नुसते गॅरेज बिल्डर सेपरेट युनिट किंवा फ्लॅट दाखवून विकू शकत नाही. 2010 Judgement Nahalchand Laloochand Pvt. Ltd. v Panchali Co-operative Housing Society Ltd. (AIR 2010 SC 3607).
मग प्रश्न असा उभा राहतो कि काय महारेरा हे सुप्रीम कोर्ट पेक्षा मोठे आहे ? 

८. आणि हौसिंग फेडेरेशन चा तर स्वतंत्र कारभार आहे.

मेम्बर्सनी महावितरण कर्मचाऱ्यांना मीटर जोडण्यास मज्जाव केला तर त्यानेही दादागिरीत सांगितले, "आम्ही मीटर जोडणारच. नंतर तुम्ही तो फोडूही शकतात."  म्हणजे, जेणे करून सोसायटी मेंबर फौल्ट मध्ये येतील. हे असं सर्व वातावरण निर्माण झाले आहे. अर्धे मेंबर तर मुंबईत राहतात, त्यांनी फ्लॅट भाड्यावर देऊन ठेवले आहेत. त्यांना सोसायटी बद्दल काही देणेघेणे नाही. आणि इथे वास्तव्यास असणाऱ्या सरळ मार्गी मेंबर्स ना चीड येतेय, पण काही करू शकत नाहीत. एकूणच काय, आम्ही एक एक दिवस ह्या भीतीत घालवत आहोत, कि आमचा फ्लॅट परस्पर विकला जाऊ नये, नाहीतर आमच्यावर पण बेघर व्हायची वेळ येईल.  

सध्याचे खजिनदार ज्यांनी सर्वांतर्फे पुढाकार घेऊन विरोध केला होता, त्यांना मारण्यासाठी इमारतीच्या आजूबाजूस माणसे उभे ठेवण्याची तयारी त्या गॅरेज खरीददाराने केली होती, असे हल्लीच खजिनदारांच्या पत्नीकडून कळले. त्यामुळे, त्या खजिनदारानी पण इमारतीत येण्याचे जवळ जवळ बंद केले आहे. आता, ते परिवाराला घेऊन त्यांच्या सासऱ्यांच्या घरी राहत आहेत.

अर्थात, माझ्या मते खजिनदारांचे मत पण बरोबर आहे. त्यांचे म्हणणे आहे, "सेक्रेटरी बाहेर राहणार निवडला आहे. तो येत नाही, लक्ष देत नाही, मग मी कशाला सर्वांसाठी लढू". कारण, त्या गॅरेज वाल्याने जबरदस्ती ने वीज मीटर लावल्यावर, आजी खजिनदार, आजी चेयरमन, आणि काही सदस्यांनी एका लोकल नगरसेवकाचा सल्ला घेतला. त्यांनी, बदलापूर मुनिसिपालिटी, पोलीस स्टेशन व वीज मंडळाला ठराविक मथळा असलेले पत्रं सोसायटी तर्फे सबमिट करा असे सांगितले होते. त्या पद्धतीने मी पत्राचे फॉरमॅट बनवून आजी खजिनदाराना दिले.  आज १५/८/२०१९ आहे, त्या अनुषंगाने जी मागची सभा झाली, त्यात इथे राहणारे सोसायटी सदस्य त्या पत्रांवर सही करून वरील संस्थांना ती पत्रं वरील सबमिट करतील, असे अपेक्षित होते.
पण, त्या मीटिंग मध्ये माजी खजिनदाराने त्याच्या पत्नीला बोलवून माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली, "ह्याने, (म्हणजे मी) गॅरेज विकण्यात माझा (म्हणजे त्या खजिनदराचा) पण सहभाग आहे." आणि, मी असे बोललो हे प्रूफ करण्यासाठी त्या माजी खजिनदारांची पत्नी उपस्थित सदस्यांवर प्रेशर टाकत होती, मी वरील वाक्य बोललो म्हणून. त्या सर्व उपस्थित सदस्यांनी सांगितले, "संदिप तसा बोललेलं नाही." तर त्यांची पत्नी सदस्यांशी भांडायला लागली व मग आमची बाचाबाची सुरु झाली, तेव्हा माजी खजिनदाराच्या तोंडून त्यांच्या मनातील गोष्ट बाहेर पडली व त्यांनी मला धमकी दिली, "तू इथे राहतोस कसा, तेच बघतो." आणि, त्यांच्या पत्नीने खाली उतरताना आमच्या दारात धमकी दिली "घरात घुसून मारिन." मागे पण, एका वेगळ्या विषयावरून सदर महिलेने आम्हाला अशीच धमकी दिली आहे. आम्ही, आता पर्यंत ह्या धमक्यांना उत्तर दिलेले नाही.
तरी पण मी कळवळीने सांगत होतो,  ह्या लेटर्स वर विचार करा व सबमिट करूयात. तेव्हा माजी खजिनदाराने उद्धटपणे दुसऱ्यांदा मला सांगितले, "तू  मेंबर नाही, तुला काय करायचे आहे, मेंबर बघतील."
त्यामुळे, मग मला आजी सेक्रेटरी वर पण शंका आलीय, माझ्यावर आरोप होत असताना माझी बाजू मांडण्यासाठी मला बोलावले नव्हते, मोठं मोठे आवाज यायला लागले तेव्हा मी स्वतः वर मीटिंग मध्ये गेलो, तेव्हा वरील प्रकार घडला. आणि, मग त्या सेक्रेटरी ने मीटिंग कॅन्सल केली, त्यामुळे आम्हाला मिळालेली धमकी आम्ही सर्व मेंबर समोर मांडू शकलो नाही. तसेच, जी पत्रं सोसायटी तर्फे संस्थांना सबमिट करायची होती, तो विषय पण बाजूला राहिला.
आता तर तो गॅरेज खरेदीदार बिनधास्त झाला आहे, अधिकृत मेंबर बनवलेला नसताना पण त्याने डायरेक्ट गॅरेज भाड्यावर दिले आहे व दिवस रात्र वापरायला सुरुवात केली आहे.
माझे वडील (माजी सेक्रेटरी) पण त्यामुळे आता घाबरले आहेत. आणि, आम्ही सांगितलं, पोलिसात तक्रार करूयात, तर काहीच बोलले नाहीत. त्यामुळे, मी पण गप्प बसलो आहे, कारण, बिल्डर, घाटकोपरच नगरसेवक, तो बिजनेसमॅन हे आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या पॉवरफुल समजले जातात. आणि, ह्यांना मेंबर्स मधून कुणाकुणाचा छुपा सँपोर्ट आहे ते हि माहित नाही. त्यामुळे, आता आम्हाला आमचा स्वाभिमान बाजूला ठेवून घाबरून शांत पणे तणावाखाली राहावे लागत आहे.

 (वरील लेख हा घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे, त्यामुळे जर शक्य झाले तर आम्ही ह्या इमारतीत फ्लॅट घेतल्यापासूनच्या घटना पण जर मन झाले तर मांडू. आता मी खूप उद्विग्न आहे, कारण, कायदेशीर खोटे व लबाड वागणाऱ्या लोकांविरुद्ध लढ्याची हिम्मत आता पूर्वी प्रमाणे लोकांमध्ये राहिलेली नाही.)

Saturday, October 20, 2018

एच डी एफ सी फंडामेंटल डिफेक्ट

एच डी एफ सी कर्ज ची कागदी कारवाई पूर्ण केल्यावर आम्हाला इन्शुरन्स वाल्याकडे पाठवण्यात आले. त्यांनी सर्व समजावले. पण मुळात मलाच पटले नव्हते, इ एम आय भरा, परत दरमहा इन्शुरन्स भरा. म्हणून, आम्ही नकार दिला. व त्यानंतर जमेल तसे फिक्स्ड डिपॉजिट ठेवायला सुरुवात केली. आम्हाला माहित होते, आय डी बी आय मध्ये मॅच्युरिटी दिवशी एफ डी ऑटोमॅटिक क्रेडिट येतो, जर ऑटो क्लोजर ऑपशन सिलेक्ट केले तर. म्हणून एच डी एफ सी मध्ये पण तोच ऑपशन सिलेक्ट केला.

आम्हाला आमच्या कर्ज रकमेएवढी एफ डी बनवायची होती, पण मधेच जी एस टी आला आणि सर्व अकाउंटंट ना त्याने स्क्रॅप करून टाकले. सर्व अकाउंटंट चा अनुभव एका रात्रीत झिरो करून टाकला. मी अनएम्प्लॉईड आहे. आता सर्व सीए च बघतात. त्यामुळे आमची एफ डी चैन पण खंडित झाली.

त्यातील पहिला एफ डी मॅच्युरिटी दिवशी ऑटो क्लोजर ऐवजी ऑटो रिन्यू मध्ये गेला व रिन्यू झाला. मग, मात्र सटकली, शेयर मार्केट मधील तज्ज्ञ सांगतात हि कंपनी फंडामेंटली मजबूत आहे, आणि बघा हा केवढा मोठा फंडामेंटल डिफेक्ट घडला आमच्या बरोबर.  आणि सर्वात मोठा डिफेक्ट म्हणजे ऑनलाईन लॉगिन मध्ये "रिपेयमेन्ट ऑफ डिपॉजिट" हा ऑपशन च नव्हता. मग काय दिलं बाळकडू.  बघा हा ई-मेल.😠



आणि, त्यानंतर कालच आम्हाला समजले कि, एच डी एफ सी ने आय डी बी आय प्रमाणे "रिपेयमेन्ट ऑफ डिपॉजिट" व ऍक्सिस प्रमाणे "प्री मॅचुर विथड्रॉव्हल" हा ऑपशन पण आता दिला आहे. बघा स्क्रीनशॉट. ह्याला म्हणतात सँडी-एक ग्राहकाची पॉवर.  💪

After completing the Paper procedure of HDFC Loan, they had sent us to the Insurance Advisor. We have heard the entire scheme, but our mind was not ready for paying Insurance per month alongwith the EMI. Hence, we denied. And started investing in FD's. We were aware that on maturity FD gets auto credit to our Bank if we select 'Auto Closure Option' as we were receiving it in IDBI.

We wanted to make the FD amount equal to our Loan amount. But, in one night GST has scraped all Accountants and their experiences. Now, CA's only see everything. I am jobless and Hence, our FD chain is also being stopped.

Our first maturing FD has gone to "Auto Renew" instead of "Auto Closure". The share market experts says that HDFC Ltd. is fundamentally good Company. But, this fundamental defect has been happened with us. Also, there were no option to close the FD from our online Login. Then our mind got angry and Hence, we have feedbacked to them. See email.😠

And, yesterday Only we came to know that HDFC has provided "Repayment of Deposit" option like IDBI and also "Pre mature Withdrawal" option like axis in an Online Login. See the screenshot.   💪

Thursday, September 27, 2018

पितृ पंधरवडा

नवरात्र ९ दिवस असते, गणपती १० दिवस असतात पण पितृपक्ष 'पंधरवडा' (१५ दिवस) असतो. तरीही बऱ्याच जणांकडून तो दुर्लक्षित रहातो. कारण मृत्यूपश्चात असलेल्या अस्तित्त्वावर त्यांचा विश्वास नसतो.

पृथ्वीच्या दक्षिणेला 'पितर' लोक असतो व त्याची देवता अर्यमा असते. आपल्या पितरांना चांगली गति मिळावी म्हणून पुत्राने 'श्राध्दकर्म' करावयाचे असते. पुत्र या शब्दाचा अर्थच "पुं" नावाच्या नरकापासून तारतो तो पुत्र. देह सोडल्यानंतरचा जिवाचा प्रवास सुखकर व्हावा, त्याला नरकात जावे लागू नये म्हणून सर्वपितरी अमावस्येला अपराण्ह काळी (दुपारी बारा वाजता) तज्ञ ब्राह्मण जो श्राध्दविधी करतात तो अत्यंत शास्त्रोक्त असतो. ह्या विधीकडे दुर्लक्ष करू नये.

श्री गुरुचरित्रांतील छत्तीसाव्या अध्यायात पितर कसे येतात व अन्नग्रहण करतात ते सविस्तर दिले आहे. दशरथ राजांच्या श्राध्दविधीचे वेळी त्यांनी ऋषींच्या माध्यमातून प्रसाद ग्रहण केल्याचा दाखला दिला आहे. एकनाथ महाराजांनी तर अडेलतट्टू ब्राह्मणांच्या नाकावर टिच्चून साक्षात पितरांनाच खाली आणले होते. मृत्यूनंतरचा जिवाचा प्रवास सोपा नसतो.  वैतरणा नदीचे वर्णन ऐकून तर अंगावर शहारा येतो. ती नदी पार करण्यासाठी हा विधी पुत्राने श्रध्दापूर्वक केला पाहिजे. ज्ञानी ब्राह्मण हा विधी करतात तो जर लक्षपूर्वक ऐकला तर याचे महत्व पटते. भाद्रपद कृ.१ पासून सुरू होणारा पित्रुपंधरवडा हा पितरांच्या सेवेसाठी फार महत्वाचा असतो.

भाद्रपद अमावस्ये पर्यंत पितर हे पितृलोकातून अर्यमा देवतेच्या आज्ञेने पृथ्वीतलावर येत असतात व त्यांच्या पुत्राने त्यांच्या मृत्यूतिथीला त्याना आवाहन करून पिंडदान करायचे असते. जर नाही केले तर 'पितृदोष' नव्हे तर त्यांची नाराजी घरामध्ये अडचणी आणते. म्हणून आपली कुलदेवता आणि आपले पितर यांना कधीही विसरू नये.

जातक समस्या घेऊन येतो तेंव्हा ज्योतिषाने ह्या दोन गोष्टी नीट होत आहेत ना याकडे आवर्जून लक्ष द्यावे. सर्वपितरी अमावास्या तर सर्व पितरांचे श्राध्दविधी करण्यासाठी उत्तमच. एकवेळ मृत्यूतिथीला नुसता शिधा किंवा चटावरचे श्राध्द चालेल पण सर्वपितरीला यथासांग विधी गुरुजींच्या मार्फतच करावेत. आपल्या मनाने कोणालातरी जेवायला बोलावणे, घराच्या गच्चीवर ताट वाढून ठेवणे, कोणत्यातरी संस्थेला देणगी देणे याने पितरांना संतोष होत नाही. वैदिक मंत्रांनी आवाहन करून सन्मानाने त्यांना आमंत्रित करावे लागते तरच ते पिंडग्रहण करतील. ज्ञानी ब्रह्मवृंदच ते शास्त्रोक्त कर्म करू शकतात.

पितृपंधरवड्याचा फार बाऊ करू नये. मंत्रिमंडळाचा वीस्तार पुढे ढकलणे, खरेदी लांबणीवर टाकणे, व्ययसायाचे करार न करणे, विवाहाची बोलणी सुध्दा न करणे, शुभ गोष्टींसाठी वर्ज्य  समजणे ही अंधश्रध्दा होय. सारासार विवेक करावा. नाही तर अन्न, पाणी आणि श्वासही वर्ज्य करावा लागेल. अतिरेक टाळावा

ज्यांनी आपल्यासाठी एवढ्या खस्ता काढल्या त्यांचे एक दिवस स्मरण करणे आपल्याला जड वाटू नये.

~~~~~~
 कावळा हा वैवस्वत कुळात जन्माला आलेला आहे जो पर्यंत  वैवस्वत मन्वन्तर आहे तो पर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे म्हणून पिण्डाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल असे श्रीरामानी कावळ्याला वरदान दिले आहे म्हणून कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा अन्न रूपाने पापाचे भक्षण करतो व श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पितरांना त्रांस होत नाही म्हणून कावळ्याला अन्न किंवा पिंड देतात.

सौजन्य :- नरेश सरकारे, वॉट्सअँप फॉरवर्ड

Monday, June 25, 2018

स्वप्नातील घर : भाग १० - लोन डिसबर्समेंट



दि. २७ जुलै २०१७ रोजी एक्सर्बिया सानपाडा (०२२-६१०९३८०३) मधून पत्नीला ऑफिस मध्ये असताना फोन आला, "तुम्हाला HDFC बँक मध्ये उद्या जाऊन चार्जेस भरायचे आहेत."
मग पत्नीने घरी आल्यावर पुन्हा फोन केला, "कोणते चार्जेस भरायचे आहेत ?"

तो बोलला, "स्टॅम्प ड्युटी". 

पत्नी :- कोणती स्टॅम्प ड्युटी, आम्ही तर सर्व आधीच भरले आहेत.

तो :- लोन वरची स्टॅम्प ड्युटी जी लोन ऑफर लेटर मध्ये रु १,५००/- दाखवली आहे ती अधिक GST पकडून जी रक्कम होईल ती व सोबत तुम्हाला ओळख व पत्ता पुरावा व दोन फोटो घेऊन जावे लागतील लोन डिसबर्स करण्यासाठी.

पत्नी :- माझे पती गेले तर चालतील का ? पण ते सह-कर्जदार नाहीत.

तो :- चालेल. पण त्यांच्या सोबत त्यांचे व तुमचे प्रूफ पाठवा.

पत्नी :- ठीक आहे.
-------------
आणि २८ जुलै ला पत्नीला ई-मेल व एस एम एस आला कि, तुमचे पार्ट लोन डिसबर्समेंट ३१/०७/२०१७ रोजी करण्यात येईल.  बघा हा ई-मेल....


म्हणून मग आम्ही HDFC लॉगिन करून बघितले, तर त्यात अजून दोन धक्के होते....

१. HDFC ने आमचे काँट्रीब्युशन रु. १,१२,७८१/- दाखवले जेव्हा कि आम्ही एक्सर्बिया ला रु १,३०,२५६/- रु आता पर्यंत दिलेले आहेत. बघा हा स्क्रीनशॉट...



२. आम्ही लोन अर्ज करताना सह-कर्जदाराचे नाव घातले नव्हते, तरी HDFC ने सह-कर्जदार म्हणून पतीचे म्हणजे माझे पण नाव टाकले आहे. बघा हा स्क्रीनशॉट.....




आणि हे वाचून आम्हाला धक्काच बसला. आम्ही तर अजून डिसबर्समेंट विनंती दिलेली नाही. मग HDFC ने डिसबर्समेंट कशी नियोजित केली !!!. आम्ही ते HDFC ला ई-मेल वर विचारले…. 

HDFC ने मग डिसबर्समेंट रद्द केले. आणि बघा HDFC चे काय उत्तर आले .....   
 




हा रिप्लाय वाचल्यावर लक्षात आले कि HDFC ने डिसबर्समेंट रद्द केले पण त्यांना १,३०,२५६/- बद्दल आमचे काय म्हणणे आहे हे लक्षात आले नाही. म्हणून मग आम्ही परत ई-मेल केले. 

मग मी स्वतः HDFC मध्ये दुपारी ४ वाजता अंबरनाथ ला पोचलो.  तिथे साधारण ४.४० दरम्यान एका रेप्रेसेंटेटिव्ह कडे पाठवण्यात आले. त्याला सांगितले लोन वरची स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. त्याने सांगितल्या प्रमाणे रु १६१४/- चा चेक सुपूर्द केला. मग त्याने केलेल्या ई-मेल बद्दल विचारले, तेव्हा आम्हाला समजले कि एक्सर्बिया ने ओरिजिनल अग्रीमेंट कॉपी आम्हाला ई-मेल न करता, थेट HDFC ला सबमिट केली व एक्सर्बिया ने स्वतः पेयमेन्ट नियोजित करून घेतली. आणि HDFC ने एक्सर्बिया (मयूर) ला विचारले कि 'कस्टमर सोबत का नाही आले, तेव्हा तो म्हणाला आम्हाला NOC दिली आहे.  म्हणजे बघा, एक्सर्बिया किंवा कोणताही बिल्डर डायरेक्ट रेजिस्ट्रार ऑफिस ला आपल्या सह्या घेतो त्यात, NOC पण असते व ते कस्टमर ला कळू न देता डायरेक्ट लोन कंपनी मधून लोन उचलतात व आपल्याला हफ्ते सुरु होतात. मग "रेरा" चा काय उपयोग आहे ग्राहकाला ?

त्याने विचारले एक्सर्बिया ने तुम्हाला अग्रीमेंट ची कॉपी दिली नाही का? मी सांगितले, 'रेजिस्ट्रेशन नंतर एक्सर्बिया आम्हाला ७ दिवसात ई-मेल करणार होते. अजून त्यांनी कॉपी पाठवली नाही. आणि तुमच्याकडे (HDFC) कडे ओरिजिनल कॉपी सबमिट केली आणि तुम्ही कर्जदाराला न विचारता डायरेक्ट पेयमेन्ट पण नियोजित केली.' ह्यावर तो गप्प बसला. 

मग मी हि त्याला जेवढे आठवले, ते प्रश्न विचारले.

मी : इ एम आय कधी सुरु होते ? पार्ट डिसबर्समेंट वर पण सुरु होते का ?

युवनाथ : इ एम आय पार्ट डिसबर्समेंट वर पण सुरु करता येते. 

मी : हे प्री-इ एम आय काय असते ?

युवनाथ : प्री इ एम आय म्हणजे व्याज आकारणी. म्हणजे समजा तुम्ही २७ तारखेला डिसबर्समेंट / पार्ट डिसबर्समेंट केले कि, तुमचा इ एम आय सुरु होतो पुढच्या १ तारखेला पण, २७ तारीख ते ३१ तारखे पर्यंत जे व्याज चार्ज होते त्याला प्री इ एम आय म्हणतात.

मी :- डिसबर्समेंट वेळी काय डोकमेण्ट घेउन यायचे ?

युवनाथ :- २ फोटो, ओरिजिनल - पण कार्ड, आधार कार्ड दोन्ही कर्जदाराचे, बँक चेक बुक.

मग मला IGR बद्दल आठवले... माझ्या बऱ्याच वॉट्सअँप ग्रुप मधून एक कस्टमर मिळाला, त्याने J5-608 बुक केला आहे. त्याच्या कडून कळले कि, त्याला साधारण रु ५,१००/- IGR म्हणून भरावे लागले.  

त्या कस्टमर ने सांगितले कि, एजन्ट HDFC च देते व तो सर्व प्रक्रिया पूर्ण करतो. म्हणून मग मी हि HDFC ला विचारले...

मी :- IGR आम्हाला सुद्धा लागेल का ? आणि किती भरावा लागेल ? आम्ही करू शकतो का ?
युवनाथ :- IGR बेसिक रु १,४००/- पण इतर खर्च पकडून २५००/- ते ३०००/- होतील, ते एजन्ट च सांगेल व IGR पहिली डिसबर्समेंट झाल्यावर करायचा असतो. तुम्ही पण करू शकता, पण प्रक्रिया खूप मोठी असते. IGR  ऑनलाईन भरून सर्व डोकमेण्ट चा सेट बनवावा , तो HDFC मध्ये आणायचा, स्टॅम्पिंग करून तो रजिस्ट्रार ला सबमिट करायचा, मग एक पावती HDFC मध्ये जमा करायची व एक ग्राहकाला द्यायची. हि सर्व प्रक्रिया एजन्ट करतो. IGR म्हणजे फ्लॅट रेजिस्ट्रेशन झाल्यावर तुमचे इन्टिमेशन सरकारला जाते, पण लोन कोणत्या बँके कडून घेतले आहे ते IGR केल्यावर सरकारला इंटिमेट होते. 

बघा... म्हणजे हि सर्व माहिती एक्सर्बिया ने नवीन कस्टमर जे त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा फ्लॅट घेतात, त्यांना द्यायला हवी. रक्कम सांगू नये, पण अंदाज तर देता येतो... आणि ह्या बद्दल "रेरा" काय बोलते, कुणास ठाऊक !!
तुम्ही रेजिस्ट्रेशन अग्रीमेंट ची कॉपी पहिल्या डिसबर्समेंट च्या अगोदर कधीही घेऊ शकता. एकदा डिसबर्समेंट झाली कि HDFC कॉपी नाही देऊ शकत. 

मी :- एक्सर्बिया ने आम्हाला सांगितले होते कि, आम्ही ई-मेल मध्ये कॉपी पाठवू, पण त्यांनी डिरेक्टली HDFC ला सबमिट केली. त्यांनी आम्ही विचारलेले सर्व प्रश्न आधी क्लिअर करू दे व कॉपी पाठवू दे. मग आम्ही डिसबर्समेंट चे बघू. 

युवनाथ :- एक्सर्बिया तर मोठी कंपनी आहे.. त्यांच्या कडून असे काही होईल वाटत नाही.

मी :- आता तुमच्या समोर उदाहरण आहे. इंटर्नल व खूप कायदेशीर प्रॉब्लेम्स आहेत. पुणे - सानपाडा ऑफिस मध्ये कॉ-ऑर्डिनेशन नाही. 

पुढे बोलणार होतो "HDFC ला पण कधीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो", पण विचार केला जाऊ दे, दोन्ही मोठ्या संस्था आहेत. मी एकट्याने बोलण्याने काय होणार!

मी :- PMAY ची एलिजिबिलिटी आहे ना ? आम्ही लोन अर्ज बरोबर PMAY ऑनलाईन अर्ज पण सबमिट केला होता. तुमच्याच रेप्रेसेंटेटिव्ह ने सांगितले होते.

युवनाथ :- PMAY साठी एक फॉर्म भरावा लागतो, ते सुद्धा फर्स्ट डिसबर्समेंट वेळीच होईल.

आणि मग मी HDFC मधून बाहेर पडलो.
================

क्रमश :
हि लेखमालिका स्व-अनुभवावर आधारित आहे. ह्यात कोणत्याही व्यक्ती वा संस्थेचा अपमान किंवा मानहानी किंवा जाहिरात करण्याचा हेतू नाही. पण आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला स्वतःचे घर घेताना येणाऱ्या प्रक्रियांचा अनुभव व्हावा हाच उद्देश आहे. कारण, इतर कोणीही त्यांना घर घेताना काय प्रक्रिया करावी लागली व काय सतर्कता बाळगावी लागली हे दुसऱ्याला सांगत नाहीत. म्हणून वाटले आपल्या सोबत घडणाऱ्या घटना आपल्यासारख्याच इतरांना मार्गदर्शक ठरतील, म्हणून हा खटाटोप.