कुंजाचा स्थलांतराचा प्रवास हा सर्वाधिक खडतर प्रवासांपैकी एक मानला जातो. कारण मंगोलिया चीन किंवा आशिया खंडाच्या वरच्या भागातून हिंदुस्थानात येताना या पक्ष्यांना हिमालयाच्या रांगा ओलांडून यावे लागते. या प्रवासात हे पक्षी समोर १५,००० फुटांपासून ते २५,००० फुटांपर्यंत उंच उडतात. थकवा, थंडी, भूक आणि शिकार यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.
गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून हे कुंज पक्षी मुंबईच्या दिशेला फिरकलेले नव्हते. त्यामुळे एलिफंटावरून उरणला जाताना जेव्हा हे पक्षी दिसल्याचा मला फोन आला मी त्वरित उरणला जायचं ठरवलं. बराच वेळ त्या भागात पक्षी निरीक्षण करून संध्याकाळी ५च्या सुमारास आम्ही उन्हाने रापून परतीला लागलो. तोच उरणजवळील बेलपाड्याच्या पाणथळीवर आम्हाला या सुडौल कुंज पक्ष्यांनी दर्शन दिले.
सुमारे १० वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ मुंबईकडे न फिरकलेले हे पक्षी आज उरणजवळच्या पाणवठ्यावर विसावले होते. ७ फेब्रुवारीला सकाळी दहाच्या सुमारास १५ ते १६ क्रौंच पक्षी एलिफंटाच्या बेटावरून उडत उरणच्या दिशेला गेले. आम्ही मनसोक्त फोटोग्राफी केली पण...
हा पाणवठा व्र्झ्ऊ च्या हद्दीत आहे आणि नवी मुंबईच्या प्रपोजड् एअर पोर्टच्या १० कि.मी.च्या आत आहे. त्यामुळे या भागात पक्ष्यांना अजून किती दिवस आसरा मिळेल हे देवच जाणो. कदाचित, या खारफुटीच्या पाणवठ्याला शेवटची भेट द्यायला तर आले नसतील ना हे कुंज पक्षी... सौजन्य - नंदिनी जोशी, फुलोरा सामना १६०२१३