- माऊस ही दर्शक प्रणाली आहे. माऊसला साधारण तीन बटण असतात. हल्ली वापरात असलेल्या माऊसला दोन बटण आणि एक स्क्रोलींग असते.
- माऊस कॉम्प्युटरच्या मागच्या भागाला जोडले जाते. माऊस सीरिअल, यूएसबी तसेच वायरलेस पोर्टमध्येही उपलब्ध आहे.
- माऊसचा वापर कीबोर्डच्या जोडीला करता येतो. केवळ माऊसने काम होते असे नाही.
- डिझाइन, ग्राफिक्स किंवा चित्र काढण्यासाठी माऊसचा वापर केला जातो.
माऊसचे प्रकार
- मेकॅनिकल माऊस : या माऊसच्या खालच्या बाजूला एक छोट्या आकाराचा बॉल असतो. तो माऊससोबत फिरतो. याची वायर सीपीयु ला जोडलेली असते.
- ऑप्टिकल माऊस : या माऊसलाही एक छोट्या आकाराचा बॉल असतो. माऊसच्या बाहेर पडणारा प्रकाश माऊसच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.
- कॉर्डलेस माऊस : हा माऊस बॅटरीवर चालतो. सीपीयूसोबत हा माऊस वायरलेस पद्धतीने काम करतो.
माऊस नीट चालत नसेल तर
- माऊसच्या मागील बाजूस असलेला फ्लॅप काढून आतील रबरी बॉल स्वच्छ करून घ्या.
- रोलर फिरत नसेल तर माऊस बदलावा.
- माऊसचा पोर्ट चेक करावा. तो सीपीयूमध्ये नीट कनेक्ट झाला की नाही हे पाहावे.
- पीसी रिस्टार्ट करावा जेणेकरून काही तात्पुरता प्रॉब्लेम झाला असेल तर माऊस नीट चालेल.
सौजन्य:- फुलोरा, सामना ०३०३२०१२.