- कोणत्याही डेटा ट्रान्सफरसाठी पेन ड्राइव्ह वापरला जातो. पूर्वी सीडी, डीव्हीडी आणि फ्लॉपीवर डेटा कॉपी केला जायचा. मात्र यासाठी सीडी किंवा फ्लॉपी ड्राइव्हची गरज भासते. अशावेळी पेन ड्राइव्ह उपयुक्त पडते.
- सीडी आणि फ्लॉपीमध्ये खूप कमी डेटा स्टोअर करता यायचा. मात्र हल्ली अगदी छोटा पेन ड्राइव्ह ८ जीबी मेमरी राहील इतका असतो.
- सध्या बाजारात पेन ड्राइव्हची रेंज २५६ एमबीपासून ते ३२ जीबीपर्यंत आहे.
- पेन ड्राइव्ह हा युएसबी पोर्टला जोडला जातो. पेन ड्राइव्ह ऍक्सेस करताना माय कॉम्प्युटर ओपन करून त्यात जोडलेला नवीन ड्राइव्हवर क्लीक करावे.
- पेन ड्राइव्हमध्ये आता एमपी३ प्लेअर आले आहे. यामुळे गाणी ऐकण्याबरोबरचं डेटा ट्रान्सफॉर्मरचं कामही पेन ड्राइव्ह करते.
- पेन ड्राइव्हमध्ये ट्रांसेंड, किंगस्टोन, सेंडडिस्क हे पेन ड्राइव्ह चांगले आणि उत्तम दर्जाचे मानले जातात.
- कॉम्प्युटरमध्ये पेन ड्राइव्हचा वापर करताना शक्यतो स्लीम पेन ड्राइव्ह वापरावा. जेणेकरून कॉम्प्युटरला असणार्या दोन पेन ड्राइव्ह पोर्टचा एका वेळी वापर करता येईल.
- पेन ड्राइव्ह फॉरमॅट करताना एफएटी ३२ या सिस्टीम फाईलमध्ये फॉरमॅट करावा. यामुळे नवीन आणि जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर पेन ड्राइव्ह वापरताना कोणताही अडथळा निर्माण होत नाही.
- मॉयश्चराईज जागेपासून पेन ड्राइव्ह दूर ठेवावे. जर काही कारणास्तव पेन ड्राइव्ह ओला झाल्यास तो संपूर्ण कोरडा करूनच कॉम्प्युटरवर वापरावा.
- टीम फुलोरा
सौजन्य :- सामना, १८०२२०१२